डहाणू आणि परिसरातील पश्चिम समुद्र किनार्यालगत ओएनजीसीने तेल उत्खन्नासाठी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकल्प सुरू होण्या अगोदरच मच्छिमारांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. डहाणूबरोबर दीव आणि दमण परिसरातही मासेारीवर बंदी आणल्यामुळे मच्छिमारांनी मासेारी कोठे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. डहाणू समुद्र किनार्यालगतची २ हजार एकर सागरी जमीन ताब्यात घेण्यासाठी ओएनजीसीचे कार्यकारी व्यवस्थापक पी.के.बोर्थाकूर यांनी राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. या जागेत कंपनीला १३२ मिलीयन क्युबिक मीटर गॅस मिळणार असल्यामुळे कंपनी एक भव्य प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात आहे. राजस्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी लवकरच या संबंधी डहाणूनचा दौरा करणार आहे. तापी आणि इतर नद्यांचे मुख या पसिरात असल्यामुळे वैतरणा, वापी आणि डहाणूचा परिसर मासेमारीसाठी समृद्ध आहे. ओएनजीसीचा हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास मासेमारी नष्ट होईल भिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी व्यक्त केली. या अगोदरच एस्सार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांनी दमण दीव, जाङ्गराबाद, सुरत, वसई अणि पालघर येथे तेलाचे प्लॅटङ्गॉ र् तयार केले आहेत. या परिसरात मच्छिमार गेले असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. समुद्रातील पाचशे मीटरच्या क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी बंदी होती. परंतु मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्यानंतर तटरक्षक दलाने १२.५ किलोीटरच्या क्षेत्रात मासेारी करण्यास प्रतिबंध घातला आहे. या प्रकल्पामुळे मच्छिमारांच्या पोटावर गदा येणार असल्यामुळे तो अन्य जागी उभारावा. अन्यथा मासमारीची ५०० मीटर बंदीची सीमा पूर्ववत ठेवावी अशी मागणी पाटील यांनी केली आह
No comments:
Post a Comment